मध्यरात्री पर्यंत दरोडेखोरांना शोधण्याच काम सुरू आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरोडेखोरांनी अंगावर गाडी घालून एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. मध्यप्रदेश येथील काही दरोडेखोर मुंबईहून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, उर्से टोल नाका येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेत असताना एका गाडीसह आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, गुंडा स्कॉड चे पोलीस कर्मचारी शुभम तानाजी कदम यांच्या अंगावर गाडी घातली यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन कदम यांची विचारपूस केली आहे. डोंगराळ परिसरात पळून गेलेल्या आरोपींचा मध्यरात्री पर्यंत शोध सुरू होता. आत्तापर्यंत नऊ दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आणखी काही दरोडेखोर हे डोंगराळ परिसरात लपून बसले असल्याचं सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी सांगितले आहे. 

नेमकं द्रुतगती मार्गावर पोलीस आणि दरोदेखोर यांच्यात काय घडलं?

मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार आणि दरोडेखोर हे मुंबईहून पुण्याचे दिशेने पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी उरसे टोल नाका येथे सापळा रचला. दरोडेखोर दोन गाड्यांमध्ये होते. ते उर्से टोल नाका येथे येताच त्यांना गाडीतून खाली उतरण्यास पोलिसांनी सांगितले. पैकी एका गाडीतील पाच जण खाली उतरले तर इतर दरोडेखोर पोलिसांना बघून गाडीसह पळण्याचा प्रयत्न केला. गुंडा स्कॉड च्या कदम यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता यात दरोडेखोरांच्या गाडीचा डॅश लागल्याने पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. गाडी तशीच मुंबई च्या विरुद्ध दिशेने घेऊन जात काही अंतरावर थांबले आणि गाडीतील दरोडेखोरांनी डोंगराळ परिसरात पसार झाले. पैकी काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्से टोल नाका परिसरातील डोंगराळ भागात पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. मध्यरात्री पर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते. गुंडा विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक, गुन्हे शाखा युनिट पाच हे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी डोंगराळ भागात आरोपींचा शोध घेत आहेत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle robbers critical commissioner police hospital ysh
First published on: 21-01-2022 at 02:04 IST