बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने कोयत्याने…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केला होता

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून त्याचा राग मनात धरून अल्पवयीन भावाने धुडगूस घालत इतर पाच मित्रांच्या मदतीने कोयत्याने दहा रिक्षा आणि दोन दुचाकी अशा एकूण १२ वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी हा प्रकार उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या बहिणीने मंगळवारी आळंदीमध्ये पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर ते घरी आले. याचा राग मनात धरून रात्री ११ च्या सुमारास त्याने इतर पाच मित्रांच्या साथीने वेताळ नगर परिसर आणि राहत असलेल्या इमारतीच्या जवळील १० रिक्षाच्या काचा कोयत्याने फोडल्या. तसंच इतर दोन दुचाकींचं नुकसान केलं आहे.

याप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

चिंचवड पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vehicles attack by youngsters in pimpri chinchwad kjp 91 sgy

ताज्या बातम्या