पुणे : स्वरराज छोटा गंधर्व, ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्यासह अनेक कलाकारांना साथसंगत करणारे जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्हायोलिनवादक परशुराम बापट (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन कन्या, मुलगा, सून, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळामध्ये (एसएससी बोर्ड) दीर्घ काळ नोकरी करून बापट यांनी संगीताची सेवा केली. बापट यांच्या व्हायोलिनच्या सुरांनी संगीत नाटकांची गोडी वाढली होती. मनमिळाऊ स्वभावामुळे समकालीन व्हायोलिनवादकांमध्ये ते लोकप्रिय होते. व्हायोलिन ॲकॅडमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने बापट यांना सन्मानित करण्यात आले होते.