scorecardresearch

पुणे : जिल्ह्यातील शासकीय कार्यालये ओस पडली, संपाचा परिणाम

जिल्हाधिकारी कार्यालय, विधान भवन, मध्यवर्ती शासकीय इमारत, नवीन प्रशासकीय इमारत येथील शासकीय कार्यालये ओस पडली आहेत.

government offices Pune empty
पुणे : जिल्ह्यातील शासकीय कार्यालये ओस, संपाचा परिणाम (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी आजपासून राज्य शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, विधान भवन, मध्यवर्ती शासकीय इमारत, नवीन प्रशासकीय इमारत येथील शासकीय कार्यालये ओस पडली आहेत.

हेही वाचा – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सोमाटने टोल नाका इथे आंदोलन सुरु

हेही वाचा – बारावीची परीक्षा सुरळीत सुरू, संपाचा परिणाम नाही

शैक्षणिक तसेच अन्य कामासाठी लागणारे दाखले, जमीन किंवा इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, तसेच जातीचे प्रमाणपत्र, जयंती-उत्सव काळात लागणारे परवाने, तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता, आधार प्रमाणीकरण, केवायसी अपडेट आदी कामांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा तहसील कार्यालयात राबता असतो. ही कामे संपामुळे ठप्प झाली आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातही राज्यभरातील महसूल कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसंदर्भात बेमुदत संप पुकारला होता. या संपात जिल्ह्यातील १३०० हून अधिक पदाधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 12:49 IST
ताज्या बातम्या