पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) कमांडंट पदी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. व्हाईस ॲडमिरल कोचर यांनी नुकतीच एअर मार्शल संजीव कपूर यांच्याकडून एनडीएच्या प्रमुख पदाची धुरा स्विकारली. व्हाईस ॲडमिरल कोचर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून १९८८ मध्ये त्यांनी भारतीय नौदल सेवेत प्रवेश केला होता. डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, नेव्हल वॉर कॉलेज मुंबई आणि ब्रिटन येथील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स येथून त्यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण केले.

तब्बल ३४ वर्षांच्या नौदल सेवेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नौदलाच्या पश्चिम विभागाचे (वेस्टर्न फ्लिट) फ्लिट कमांडर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. परदेशातील अनेक महत्त्वाच्या मोहिमांसह आपत्ती निवारण आणि मदत कार्यातील मोहिमांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. आयएनएस विक्रमादित्य वरील त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानात्मक नौदल मोहिमांसाठी विक्रमादित्यला पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर तैनात करण्यात आले होते. आयएनएस किरपान या क्षेपणास्त्रसज्ज कॉर्वेट प्रकारातील युद्धनौकेचे त्यांनी ऑपरेशन पराक्रम मोहिमेदरम्यान नेतृत्व केले. व्हाईस ॲडमिरल कोचर यांनी नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयातील अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे. तसेच, नौदलाच्या क्षमता विस्ताराच्या दृष्टीने त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. भारतीय नौदलासाठी युद्धनौकांच्या बांधणीच्या कार्यातही व्हाईस ॲडमिरल कोचर यांची कामगिरी महत्त्वाची आहे.

Court Grants Pre Arrest Bail, Rashtriya Swayamsevak Sangh, name misusing Case, rss name misusing Case, Pre Arrest Bail, rss, marathi news, nagpur news,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग, न्यायालय म्हणाले…
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी