पुणे : कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर वडाचीवाडी परिसरात असलेल्या गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर काळेपडळ पाेलिसांनी छापा टाकला. या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे १२ हजार लिटर रसायन, चार हजार ३४० लिटर गावठी दारू असा नऊ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

जगदीश भैरूलाल प्रजापती (वय २४, रा. काळेपडळ), गुलाब संपकाळ रचपूत (वय ३३, रा. होळकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे पथक वडाची वाडी परिसरात गस्त घालत होते. वडाचीवाडी येथील ओढ्याजवळ दोघे जण गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. आरोपी प्रजापती, रजपुत यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गावठी दारू भरलेले १२४ कॅन आणि १२ हजार लिटर कच्चे रसायन, दोन मोबाइल संच असा ९ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत
Chichghat Rathi village in Vidarbha
गाव करी ते राव नं करी, ‘हे’ गाव ठरले विदर्भात अव्वल
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
Rapid hair loss and baldness are caused by increased nitrate levels in water
केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल, पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!

हेही वाचा >>>रामटेकडीत भंगार मालाच्या गोदामाला आग; रहिवासी भागात आग लागल्याने घबराट

सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक अनिल निंबाळकर आणि पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader