लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना वगळून नव्याने ‘फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषद’ स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश काढल्याने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे आता पुणे महापालिकेच्या हद्दीत बदल झाला आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे २०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, या गावांतील मिळकतींना मोठ्या प्रमाणात मिळकतकर लावण्यात आल्याने या गावांतील नागरिक आणि व्यापारी यांनी कर कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेकडून कर कमी करण्यात न आल्याने ही गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी करण्यात आली होती. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ही गावे वगळून या दोन गावांची नगर परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Bank dispute in private building is in police case filed against Canara Bank management
खाजगी इमारतीतील बँकेचे भांडण पोलिसात, कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीची बैठक घेऊन गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याआधारे आता राज्य सरकारने ही गावे महापालिका हद्दीतून वगळून ‘फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषद’ स्थापन करण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे ही गावे आता महापालिका हद्दीतून वगळली गेली आहेत.

कचरा डेपो महापालिकेकडे

फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळण्यात आली असली, तरी या गावांमध्ये असलेला कचरा डेपो हा महापालिकेकडे असणार आहे. हे क्षेत्र नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेची नवीन हद्द अशी

उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुली गांवाची हद्द
उत्तर पूर्व – लोहगाव, वाघोली या महसुली गावांची हद्द
पूर्व- मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, हडपसर या महसुली गावांची हद्द आणिफुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द
दक्षिण पूर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसुली गावांची हद्द आणि उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द
दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसुली गावांची हद्द
दक्षिण-पश्चिम – पश्चिमेला नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसुली गावांची हद्द
पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बुद्रुक आणि खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द
पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसूली गावांची हद्द आणि पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द

‘टीपी स्क्रीम’बाबत निर्णय नाही

राज्य सरकारने उरुळी देवाची (टीपी स्कीम-६) आणि फुरसुंगी (टीपी स्कीम-९) येथे ३७१ हेक्टर क्षेत्रावर दोन नगररचना योजनांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी दिली होती. या दोन्ही ‘टीपी स्कीम’ करण्यासाठी महापालिकेला सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, या दोन्ही गावांतील कर्मचारी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. आता पुन्हा वर्गीकरणाची प्रक्रिया करावी लागणार आहे.