scorecardresearch

पुणे : उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार

कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारातील भाषणावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुत्वासाठी मतदान करा.

devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारातील भाषणावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुत्वासाठी मतदान करा.

हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणुकीचे मैदान कोण मारणार हे उद्या दुपारी चारपर्यंत होणार स्पष्ट

कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे, असे सांगतानाच पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्येश्वर मंदिराबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले होते. निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.  हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा ठरला आहे.  त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने कार्यवाही करावी, असे धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 21:03 IST
ताज्या बातम्या