रक्तद्रव उपचारांमुळे विषाणू उत्परिवर्तन शक्य

करोना रुग्णांसाठी रक्तद्रवाचा अतिरेक नको ; राज्य करोना कृती दलाचे आवाहन

(संग्रहित छायाचित्र)

करोना रुग्णांसाठी होणारा रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारांचा अतिरेकी वापर विषाणू उत्परिवर्तनास कारणीभूत ठरू शकतो, असे चित्र समोर येत आहे. रक्तद्रव उपचारांच्या सर्व प्रकारच्या नियंत्रित चाचण्यांमधून (रँडमाईज्ड कं ट्रोल्ड ट्रायल्स) कोणतेही समाधानकारक निष्कर्ष हाती लागलेले नाहीत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांशिवाय इतरांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रक्तद्रव देणे हिताचे नसल्याचे राज्य करोना कृती दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य करोना कृ ती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी रक्तद्रव उपचारांबाबत आपली भूमिका ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट के ली. डॉ. जोशी म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णाचा रुग्णालयातील मुक्काम एक ते दोन दिवसांपर्यंत कमी करते. रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारांच्या चाचण्यांमधून असे कोणतेही समाधानकारक निष्कर्ष समोर आलेले नाहीत. नेचर या जगप्रसिद्ध विज्ञानविषयक नियतकालिकाने प्लाझ्माच्या अतिरेकी वापरामुळे विषाणू उत्परिवर्तनही शक्य असल्याचे शोधनिबंधात म्हटले आहे.

या सर्व बाबी विचारात घेता प्लाझ्मा उपचारांसाठी रुग्णांचे नातेवाईक करत असलेली धावपळ अनाठायी असल्याचे दिसते. करोना रुग्णांबरोबरच इतर अनेक रुग्णांवरही राज्यात उपचार होत आहेत. त्यांच्यावरील उपचारांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे यावे, मात्र प्लाझ्मा मिळवण्यासाठी अवाजवी मेहनत करू नये, असे आवाहनही डॉ. शशांक जोशी यांनी के ले आहे.

करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्रतिपिंडे रक्तद्रवाच्या रुपात सध्या संसर्गाने बाधित असलेल्या रुग्णांना देऊन त्यांना बरे करण्यासाठी देशात सर्वत्र प्रयत्न के ले जात आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने रक्तद्रव चाचण्यांमध्ये कोणतेही समाधानकारक निष्कर्ष हाती न लागल्याचे स्पष्ट के ले होते. मात्र, त्यानंतरही रुग्णांचे नातेवाईक रक्तद्रव मिळवण्यासाठी वेळ, ऊर्जा आणि पैसे खर्च करून मेहनत घेत आहेत.

रक्तदान, आजारांचे व्यवस्थापन महत्त्वाचे

करोना व्यतिरिक्त इतर अनेक आजारांच्या रुग्णांवर उपचार करताना रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. शशांक जोशी यांनी के ले. तसेच, हृदयविकार, कर्क रोग, रक्तदाब, मधुमेह अशा आजारांच्या रुग्णांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. साथरोगाच्या काळात या सर्व आजारांचे सुयोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, त्यामुळे किमान टेलिमेडिसिनसारख्या पर्यायाचा वापर करून डॉक्टरांच्या संपर्कात राहावे असेही डॉ. जोशी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Viral mutations are possible due to plasma treatment abn

ताज्या बातम्या