scorecardresearch

मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुचनेनुसार ३ आणि ४ डिसेंबर रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रांवर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी
मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी (संग्रहित छायाचित्र)

भारत निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधित्व अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांना १ जानेवारी २०२३, १ एप्रिल २०२३, १ जुलै २०२३ आणि १ ऑक्टोबर २०२३ असे वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा- पुणे महापालिकेच्या रुग्णालयांत विनामूल्य गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

सद्य:स्थितीत भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यास मुदत आहे. या कालावधीमध्ये मतदार यादीत अजून नाव समाविष्ट नसलेल्या १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तीना नाव नोंदविण्यासाठी नमुना अर्ज भरता येणार आहे. पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवावे. नाव नोंदविण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावरुन, तसेच Voter Helpline App आपल्या मोबाइल उपयोजनद्वारे नमुना अर्ज क्रमांक सहा भरावा किंवा आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा- पुणे: ‘संविधान अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे’; संविधान दौडच्या उद्धाटनप्रसंगी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले मत

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुचनेनुसार ३ आणि ४ डिसेंबर रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रांवर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 16:28 IST

संबंधित बातम्या