scorecardresearch

पुणे विद्यापीठ अधिसभेच्या अध्यापकांच्या तेरा जागांसाठी ८ जानेवारीला मतदान

महाविद्यालयातील दहा अध्यापक आणि विद्यापीठातून तीन अध्यापकांची नेमणूक केली जाणार आहे

पुणे विद्यापीठ अधिसभेच्या अध्यापकांच्या तेरा जागांसाठी ८ जानेवारीला मतदान
पुणे विद्यापीठ (संग्रहित छायाचित्र)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर प्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या अंतर्गत विद्यापीठाच्या अधिसभा, अभ्यास मंडळ आणि विद्या परिषदेवर प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ८ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

हेही वाचा- माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटात प्रवेश

विद्यापीठाचे कुलसचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रफुल्ल पवार यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी डिसेंबरमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. तसेच संस्थाचालकांच्या प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता अध्यापक गटातील प्रतिनिधींची नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात महाविद्यालयातील दहा अध्यापक आणि विद्यापीठातून तीन अध्यापकांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्याशाखेचे दोन अध्यापकांची विद्यापरिषदेवर आणि महाविद्यालयातील तीन विभागप्रमुख प्रत्येक अभ्यास मंडळावर निवडून देण्यात येणार आहे.

हेही वाचा- ‘मतांसाठी लाचार होऊन अजित पवारांनी विधान केलं’; संभाजी राजेंबाबतच्या विधानानंतर भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, निवडणुकीतील जागांसाठी आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ८ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठीची पूर्ण झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 17:01 IST

संबंधित बातम्या