पुणे : जिल्ह्यातील एका नगरपंचायतीतील चार प्रभाग आणि सहा ग्रामपंचायतींतील दहा जागांसाठी मंगळवारी (१८ जानेवारी) मतदान होणार आहे. या दिवशी संबंधित क्षेत्रातील मतदारांना मतदानासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मतमोजणी बुधवारी (१९ जानेवारी) केली जाणार आहे. इतर मागासवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या गटासाठी झालेल्या या जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील ९५ नगरपंचायती, दोन जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत प्रत्येकी सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ; तसेच सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील एक नगरपंचायत आणि दहा  ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

देहू नगरपंचायतीतील १३ प्रभागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान झाले आहे. उर्वरित चार प्रभागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या प्रभागात १२ उमेदवार उभे असून त्यासाठी ३५७० मतदार मतदान करणार आहेत. निवडणुका होणाऱ्या जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींपेकी पुरंदर तालुक्यातील कोऱ्हेवाडी, पिंपरी, पिंगोरी आणि पांडेश्वर अशा चार, आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा आणि गिरवली अशा दोन, शिरुरमधील निरवी, मुळशीमधील भूगाव, जुन्नरमधील आर्वी आणि भोर तालुक्यातील वाघलवाडी अशा एकूण सहा तालुक्यांमधील दहा जागांसाठी मतदान होणार आहे.  या दहा जागांसाठी २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी ५८६१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये २७४७ महिला मतदार आणि ३११४ पुरुष मतदार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Dhangekar Kolhe and supriya Sule sat in front of the stage in the hot sun.
मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल
Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
The dispute for two seats in the Grand Alliance is still ongoing
महायुतीत दोन जागांचा तिढा अद्याप कायम; रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताऱ्यासह ११ मतदारसंघांत आजपासून निवडणूक प्रक्रिया
Cleanliness Survey Nashik Zilla Parishad to Inspect Over 10 thousand Water Sources for Water Quality
नाशिक जिल्ह्यातील १० हजारहून अधिक जलस्त्रोतांची तपासणी

मतदानादिवशी सुटी जाहीर

मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी संबंधित क्षेत्रातील मतदारांना सुटी देण्यात आली आहे. मतदार कामासाठी मतदार संघांच्याबाहेर असतील, तर त्यांनाही सुटी लागू असेल. मतदार संघ क्षेत्रातील सरकारी आणि निम सरकारी कार्यालये, सार्वजिनक उपक्रम, बँका यांनाही सावर्जनिक सुटी राज्य सरकारने जाहीर केली आहे.