महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून आज (गुरूवार) जाहीर करण्यात आली. या मतदारयादीवर १ जुलै पर्यंत हरकती आणि सूचना देता येणार असून ९ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि प्रभागातील आरक्षण निश्चित झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी करण्याचे काम महापालिकेच्या निवडणूक शाखेने सुरू केले होते. राज्य निवडणूक आयोगाने तशी सूचना महापालिकेला केली होती. ही यादी करताना ३१ मे पर्यंतची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरण्य़ात आली आहे.

प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी महापालिकेच्या https.//www.pmc.gov.in या संकेतस्थळावर तसेच पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मतदारांनी यादीमध्ये त्यांचे नाव आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.

प्रभागनिहाय मतदार यादी करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे आदी स्वरुपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाही. त्यामुळे ३१ मे २०२२ रोजी विधानसभा मतदार यादीमध्ये ज्यांनी नावे आहेत, अशा मतदारांनाच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविता येईल, अशी माहिती निवडणूक शाखेचे उप आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर १ जुलै पर्यंत हरकती-सूचना देता येतील. एक जुलै रोजी कार्यालयीन वेळ संपे पर्यंतची मुदत त्यासाठी आहे. हरकती किंव सचूना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे किंवा मुख्य निवडणूक शाखेकडे दाखल करता येईल. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखननिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या यसंदर्भातील दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ward wise draft voter list for pune municipal corporation election announced pune print news msr
First published on: 23-06-2022 at 12:12 IST