पुण्यात गोदामाला भीषण आग; घटनास्थळी अग्निशामक दलाची १४ वाहने दाखल!

आग नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

पुण्यातील गंगाधाम येथील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, घटनास्थळी अग्निशामक दलाची १४ वाहनं दाखल झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधाम येथील आई माता मंदिराजवळ असलेल्या श्री जी लॉन्स येथील फर्निचरच्या गोदामाला साडेआठ वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या. मात्र तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आणखी चार गाड्या मागविण्यात आले आहेत.

या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असून नेमकी आग कशामुळे लागली. हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. तसेच आतमध्ये कोणी आहे का याचा देखील शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Warehouse fire in pune 14 vehicles of fire brigade arrive at the spot msr 87 svk

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या