शहरातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन वेगवान प्रवास करण्यासाठी जलद बस वाहतूक (बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी) योजना पंधरा वर्षांपूर्वी गाजावाजा करत सुरू करण्यात आली. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मार्गात होत असलेली खासगी वाहन चालकांची घुसखोरी, वाॅर्डन आणि बूम बॅरिअर्सची अपुरी यंत्रणा, स्वतंत्र मार्गिकेची कमतरता, बीआरटी मार्गावर सतत सुरू असलेली नाना प्रकारची कामे, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि महापालिका तसेच पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष आदी कारणे बीआरटी मरणासन्न होण्यास कारणीभूत ठरली आहेत.

हेही वाचा >>>पुणे : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे आमिष ; ज्येष्ठ महिलेची १५ लाखांची फस‌वणूक

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Mephedrone Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती

विशेष म्हणजे बीआरटी मरणासन्न असतानाही सुधारणेच्या नावाखाली पंधरा वर्षात शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी मात्र करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी बीआरटी मार्गाचा देशातील पहिला प्रयोग पुण्यात राबविण्यात आला. मात्र पंधरा वर्षात बीआरटीची धाव संथच राहिल्याची वस्तुस्थिती असून बीआरटी मार्ग प्रायोगिकच ठरला आहे.

पीएमपीच्या प्रवाशांसाठी जलद सेवा उपलब्ध व्हावी आणि पीएमपीसाठी स्वतंत्र मार्ग असावा, या उद्देशाने सातारा रस्त्यावर सन २००६-०७ मध्ये बीआरटी मार्गाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. शहरातील हा पहिला बीआरटी मार्ग होता. त्यामुळे एकूणच या प्रकल्पाबद्दल त्या वेळी शहरात मोठी चर्चा झाली होती. स्वारगेट-हडपसर प्रायोगिक बीआरटी मार्गानंतर स्वारगेट-कात्रज आणि नगर रस्ता, संगमवाडी-विश्रांतवाडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली. सध्या तीस किलोमीटर मार्गावर बीआरटी सेवा सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्ग कसाबसा सुरू आहे तर नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाला मेट्रोच्या कामाचा फटका बसला आहे. हडपसर बीआरटी मार्गाची तोडमोड करण्यात आली आहे. स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग तुकड्यातुकड्यांनी सुरू असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>पुणे : मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शाश्वत पर्याय म्हणून बीआरटी मार्ग राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र बीआरटी मरणासन्न कशी होईल,यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे बीआरटी मार्ग सक्षम करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. केवळ मार्ग सुरू करणे, त्याचे नूतनीकरण किंवा पुनर्रचना करणे, लेखापरीक्षण करणे, बीआरटी मार्गासाठी गाड्यांची खरेदी करणे आदी कामांसाठी एक हजार २०० कोटींचा खर्च आत्तापर्यंत करण्यात आला. एवढा खर्च होऊनही बीआरटी कुठे सुरू आहे, असा प्रश्न कायम असून प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील बीआरटी मार्ग
नगर रस्ता बीआरटी- ८ किलोमीटर
संगमवाडी-विश्रांतवाडी-८ किलोमीटर
कात्रज-स्वारगेट- ६ किलोमीटर
स्वारगेट-हडपसर- ८ किलोमीटर

सुविधा बंद

हेही वाचा >>>पुणे : विद्यापीठ चौक उड्डाणपूल जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ; प्रत्यक्ष कामाला आठ दिवसांनंतर सुरुवात

बीआरटी मार्गाच्या मूळ रचनेनुसार रस्त्याच्या मध्यभागी बीआरटी मार्ग ठेवण्यात आला होता. हा मार्ग केवळ बीआरटी गाड्यांसाठीच राखीव होता. मार्गाच्या मूळ आखणीनुसार मध्यभागी मार्ग असला तरी वाहतूक कोंडी होत असल्याची उपरती प्रशासनाला झाली आणि मार्गाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरु झाली. सुशोभीकरण, नूतनीकरण आणि पुनर्रचनेवर आत्तापर्यंत वेळोवेळी खर्च करण्यात आला आहे. राखीव बस मार्गिका, समपातळीवर बसथांबे, रूंद दरवाजे, बंदिस्त बसस्थानके, विशिष्ट प्रकारच्या पुरेशा गाड्या, प्रवासी माहिती प्रणाली, वाहन ट्रॅकिंग सिस्टिम, स्वयंचलीत प्रणाली, प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रान्सफर स्टेशन, टर्मिनल आणि डेपोवर खर्च करण्यात आला असला तरी बहुतांश ठिकाणी या सेवासुविधा बंदच आहेत.