शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ४६ हून आमदारांसह बंड केल्याने,त्याच पडसाद राज्यात उमटत आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेने मधील प्रमुख पदाधिकाऱ्यां च्या बैठका मेळावे होत आहे.त्याच दरम्यान आज पुण्यात विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्त्वाखाली मेळावा पार पडला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर सर्व आमदारांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी सचिन अहिर म्हणाले की,’काय होता तुम्ही काय झाला, तुम्ही कमळीच्या नादाला लागून वाया गेला तुम्ही अशी अवस्था या लोकांची आज झालेली आहे.अशा शब्दात बंडखोर आमदारवर त्यांनी निशाणा साधला.
यावेळी सचिन अहिर म्हणाले की, श्रीरंग बारणे साहेब आता कोणावर विश्वास ठेवयाचा,हाच प्रश्न आहे. मी आज तुम्हाला विचारतो जाताय ना,पण कुठे जात असाल तर सांगू जावा,असे सचिन अहिर म्हणताच श्रीरंग बारणे पाहतच राहिले.तेवढ्यात सचिन अहिर म्हणाले की,कुठे कमिटीसाठी वैगरे,असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
तसेच ते पुढे म्हणाले की,मी आता पालखी सोहळ्यात सहभागी झालो.त्यावेळी माझा फोन नॉट रिचेबल लागत होता. त्याचवेळी अरविंद सावंत साहेब मला शोधत होते.एका कामासाठी,तेव्हा मला इकडून तिकडून दहा फोन आले.आता हे पण नॉट रिचेबल झाले की काय असे त्यांना वाटले.कारण कोणावर विश्वास ठेवायचा,असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आमची मान कापली तरी जाणार नाही.पण दुसर्या दिवशी हेच म्हणार्याची मान गुवाहाटी मध्ये दिसली, फ्लोअर टेस्ट कदाचित पास कराल पण रोड टेस्ट ला कसे सामोरे जाल अशा शब्दात बंडखोर आमदारांवर त्यांनी टीका केली.
विधान परिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आनंदोत्सव साजरा करता आला नाही.याचा संदर्भात देत आजच्या पुण्यातील मेळाव्यात सचिन अहिर म्हणाले की,आता एवढ्यात संजय मोरे म्हणाले विद्वान आमदार,धन्यवाद,पण माझी परिस्थिती अशी झाली आहे की,मी पेढा खाल्ला पण नाही आणि पेढा कोणाला दिला, पण नाही.अशी माझी परिस्थिती झाली आहे.असे म्हणताच सभागृहात एकच पिकला.