पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता. खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव हे धरणही १०० टक्के भरले. त्यामुळे वरसगाव, पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेकचा विसर्ग दिवसभर कायम ठेवण्यात आला. चारही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २८.६७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. दिवसभरात टेमघर धरणपरिसरात २५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात ३० आणि ३१ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात चार मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत वरसगाव धरणातून ५७८५ क्युसेकने, पानशेत धरणातून ५४०८ क्युसेकने, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात २४ मि.मी. पाऊस पडला. सध्या या धरणात ८.३६ टीएमसी म्हणजेच ९८.३१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी वडज, डिंभे, घोड, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, गुंजवणी, भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत

टेमघर ३.२३ (८७.१९), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), भामा आसखेड ७.५६ (९८.५९), पवना ८.३६ (९८.३१), डिंभे ११.८७ (९५.०४), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६७ (९९.३८), नीरा देवघर ११.५३ (९८.२८), भाटघर २३.५० (१००), वीर ९.०४ (९६.०६) आणि उजनी ५६.०८ (१०४.६९)