पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता. खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव हे धरणही १०० टक्के भरले. त्यामुळे वरसगाव, पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेकचा विसर्ग दिवसभर कायम ठेवण्यात आला. चारही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २८.६७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. दिवसभरात टेमघर धरणपरिसरात २५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात ३० आणि ३१ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात चार मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत वरसगाव धरणातून ५७८५ क्युसेकने, पानशेत धरणातून ५४०८ क्युसेकने, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water continued released khadakwasla dam water storage pune print news ysh
First published on: 13-08-2022 at 23:10 IST