scorecardresearch

पुणे : शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

पर्वती जलकेंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे पेठांसह इतर भागात पाणी पुरवठा विस्कळित झाला होता.

पुणे : शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत
प्रतिनिधिक छायाचित्र

पर्वती जलकेंद्रातील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्याने मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणीपुरवठा शुक्रवारी विस्कळीत झाला. सलग दुसऱ्या दिवशी शहराला नियमित स्वरुपात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा फटका नागरिकांना बसला.

वारजे जलकेंद्रात बिघाड झाल्याने गुरुवारी कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन जिमखाना आणि शिवाजीनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळीत झाला होता. त्यानंतर पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडीत झाल्याने  पेठा, शिवदर्शन, शिंदे हायस्कूल, तावरे कॉलनी, अरणेश्‍वर, संत नगर, तावरे चौक, ट्रेजर पार्क, सहकारनगर या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत आवश्‍यक पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे या भागात आज पाणी पुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान, वारजे येथे पुन्हा दीड तास वीज पुरवठा खंडित झाल्याने कोथरूड, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, येरवडा यासह इतर भागात उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला. पर्वती जलकेंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे पेठांसह इतर भागात पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केला. महिन्याती किमान एकदा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र त्यानंतरही तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत कसा होतो, अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात  येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या