पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पुणेकरांना मात्र पुरेशा पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. धरणांमध्ये पुरेसे पाणी असतानाही ऐन दिवाळीत महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी मागत आहे.

मागील आठवड्यात शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक कामे करण्यासाठी पालिकेने गुरुवारी पूर्ण दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ज्या दिवशी पाणी बंद होते त्याच्या दुसऱ्या दिवशी कमी दाबाने आणि उशीरा पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले होते. मात्र कमी दाबाने तर सोडाच दुसऱ्या दिवशी उशीरा देखील अनेक भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
pune Hadapsar residents
हडपसर मधील नागरिक ‘ या’ कारणांमुळे त्रस्त !
pune video crowd at pune railway station
“निम्मं तरी पुणे रिकामे झाले” पुणे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी, Video होतोय व्हायरल
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तब्बल १२८ कोटींचे सोने जप्त, सहकारनगर भागात पोलिसांची कारवाई

सलग दोन दिवस पाणी न आल्याने पुणेकर नागरिक चांगलेच हवालदिल झाले होते. पाणी नक्की कधी येईल याची माहिती घेण्यासाठी बहुतांश नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या. आपल्या भागातील पाणी पुरवठा करणारे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांचे फोन उचलून त्यांना दिलासा देण्याचे साधे काम देखील महापालिकेतील कर्मचारी वर्ग करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील याची दखल घेत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

गेल्या आठवड्यात शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला असताना आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा एकदा संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (शनिवारी) २६ ऑक्टोबरला हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

हेही वाचा…उदंड जाहल्या ‘दिवाळी पहाट’

लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्रातून रामटेकडीकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. यासाठी शनिवारी हडपसर, मुंढवा, मगरपट्टा सिटी आणि आजूबाजूच्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी दिवसभर हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी रविवारी (२७ ऑक्टोबर) या भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : संपूर्ण रामटेकडी, सय्यदनगर, हेवन पार्क, शंकर मठ, वैदुवाडी, संपूर्ण मुंढवा, मगरपट्टा, आकाशवाणी, साडेसतरानळी, केशवनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, शिंदे वस्ती, भीमनगर, मिलिंदनगर, भारत फोर्ज, महंमदवाडी गाव, राजीव गांधीनगर, एन.आय.बी.एम. रोड, पोकळेमळा, हांडेवाडी रोड परिसर.

हेही वाचा…पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना

महापालिका दर आठवड्याला दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील पाणीपुरवठा बंद करत असल्याने त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. आता सणाचे दिवस असतानाही पालिका प्रशासन पाणी बंद करण्याचा निर्णय जाहीर करते. एक दिवस पाणी बंद राहिले की त्याचे परिणाम पुढे दोन ते तीन दिवस नागरिकांना भोगावे लागतात. त्यानंतर आठ ते दहा दिवस गेले की पुन्हा महापालिका विद्युत पुरवठा दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती अशा नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेते, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Story img Loader