Premium

पुण्यात ‘या’ भागात दिवसाआड पाणीपुरवठा

शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

Water supply
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पुणे : शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४, खराडी मधील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी येत आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार पासून (१० जून) खराडी मध्ये खालील प्रमाणे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवार, रविवार, मंगळवारी दुपारी १.३० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत चंदननगर,श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर,समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रस्ता परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा होईल. चौधरी वस्ती, सातववस्ती, पंढरीनगर, गुलमोहर, रक्षकनगर, शंकरनगर भागाला सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या कालावधीत शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा होईल.

हेही वाचा >>> श्री जेजुरी देवस्थानचा वाद मिटला, घेतला ‘हा’ निर्णय

शनिवार, सोमवार, बुधवार या दिवशी दुपारी १.३० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत बोराटे वस्ती गल्ली नं. १ ते १३, शंकरनगर, वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर, तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क,साईबाबा मंदिर परिसराला तर  सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजता गणपती सोसायटी, तुकारामनगर, बोराटेवस्ती, झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर परिसराला पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी नव्या वेळापत्रकानुसार सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 13:59 IST
Next Story
पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांचे फसवणुकीचे प्रकार सुरूच; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे ‘असे’ गेले दोन कोटी