पुणे : पुणे महापालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचे दुरुस्तीकाम केले जाणार आहे. या कामासाठी चांदणी चौक झोनमधील वारजे, बाणेर, बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात आज, मंगळवारी (१ जुलै) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या जलवाहिनीची गळती होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीतून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात पाणी येणार नाही. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : चांदणी चौक चौकोनी टाकी, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरु गणेशनगर, सूरजनगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतिबन सोसायटी परिसर, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाण तांडा, मोहननगर, सुस रस्ता, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस.