scorecardresearch

Premium

पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद

निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ५ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

Water supply to Pimpri-Chinchwad will be closed
गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ५ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

pavel water supply, panvel to face water cut for 36 hours, maharashtra jeevan pradhikaran
पनवेलमध्ये ३६ तास पाणी पुरवठा बंद, पिण्यासाठी की साठवणूकीसाठी पाणी भरावे सिडको वसाहतीमधील महिलांना प्रश्न
Permission to use loudspeakers and amplifiers in Ganeshotsav 2023 pune
यंदा गणेशोत्सवात सहा दिवस ‘आव्वाज’; सातव्या दिवशीही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी
navi mumbai municipal corporation, action against societies wasting water
पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या सोसायटींचा शोध; दरडोई २०० लिटरहून अधिक वापराच्या वसाहतींचा नव्याने शोध
vasai-virar water problem
वसई-विरारला ऑक्टोबरपासून मुबलक पाणी? एमएमआरडीएचे ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला आश्वासन

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती, पाणी वितरण व्यवस्थेतील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

आणखी वाचा-वीस लाख रुपयांचे पाच कोटी करण्याचे आमिष… भोंदूसह साथीदारांविरुद्ध गुन्हा

गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water supply to pimpri chinchwad will be closed next thursday pune print news ggy 03 mrj

First published on: 30-09-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×