scorecardresearch

पुणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा उद्या बंद असणार

शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता

(संग्रहीत)

वडगांव जलकेंद्र तसेच विमाननगर आणि धानोरी टाकी येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी (५ मे) करण्यात येणार आहेत. त्यामुळे या जलकेंद्र आणि टाक्यांवर अवलंबून असलेल्या काही भागांचा पाणीपुरवठा उद्या (गुरुवार) बंद राहणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (६ मे) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणी बंद असलेल्या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढील प्रमाणे –

वडगांव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, विमाननगर टाकी परिसर- संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एसआरए भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, दत्त मंदिर परिसर धानोरी टाकी- कमल पार्क, माधवनगर, धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर, सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water supply to some parts of pune city will be cut off tomorrow pune print news msr

ताज्या बातम्या