आयुक्त दिनेश वाघमारे यांची ग्वाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहराला कचरामुक्त शहर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य गरजेचे आहे, असे मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

िपपरी महापालिका व सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पर्यावरणासाठी काम करणाऱ्या विविध संस्था तसेच व्यक्तींचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुक्त वाघमारे म्हणाले, हवा, पाणी, माती या पर्यावरणपूरक बाबींचे जतन करून भावी पिढीला नैसर्गिक स्रोत उपलब्ध व्हावा. शहरातील कचरा वर्गीकरण करणाऱ्या मुला-मुलींचा विचार व्हावा. प्रत्येकाने शहर स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले.

पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, शहरातील कचरा समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने अनेक योजना राबवल्या आहेत. याकामी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत मुथियान आणि लक्ष्मीकांत भावसार यांनी केले. प्रवीण लडकत यांनी आभार मानले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are trying to do pimpri waste free city
First published on: 09-06-2016 at 03:06 IST