८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण द्यायचे राहून गेल्याने संमेलन स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांची उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागितली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर साहित्य संमेलनाला उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय. उद्धव ठाकरेंना संमेलनाचं निमंत्रण न दिल्याबद्दल पाटील यांनी मी मनापासून माफी मागतो असा माफीनामाच सादर केला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2016 रोजी प्रकाशित
उद्धव ठाकरेंना संमेलनाचे निमंत्रणच नाही; स्वागताध्यक्षांचा जाहीर माफीनामा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
First published on: 16-01-2016 at 15:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We forgot to invite uddhav thackeray says p d patil