“चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही पिंपरी-चिंचवड शहराच्या परिवर्तनाची नांदी असेल. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश आलेच पाहिजे”, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकाहून सांगितले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे, प्रथम आमदार विलास लांडे, आदी उपस्थित होते. आपापसातील मतभेद विसरून कामाला लागा. महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी काम करा, विजय आपलाच होईल, असे आवाहन अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले. 

अजित पवार म्हणाले की, पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतला आहे. तसा प्रयत्न आपण चिंचवड विधानसभेत करणार आहोत. उद्या उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा दिवस आहे. उद्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. त्याकरिता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

Narendra Modi On Electoral Bond
“…तर सगळ्यांना पश्चाताप होईल”; निवडणूक रोख्यांवरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा
priyanka gandhi
‘महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवा’
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
congress manifesto key things
Loksabha Election 2024: गरीब कुटुंबांना एक लाख रुपये ते ३० लाख युवकांना नोकरी, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने कोणती?

हेही वाचा – पुणे : कर्वे रस्त्यावर कपड्याच्या दुकानाला आग

अजित पवार पुढे म्हणाले की, स्वतः शरद पवार चिंचवड पोटनिवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, माझेदेखील या निवडणुकीवर बारीक लक्ष असणार आहे. आपल्या हातात केवळ १८ दिवस असून, आपल्याला १८ तास काम करायचे आहे. निवडणुकीची जबाबदारी समजून घ्या, मेहनतीने ही निवडणूक सोपी होईल. अनेकदा उमेदवारी मागण्याचा अधिकार कार्यकर्त्याला असतो. वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर त्याचे पालन झाले पाहिजे. गद्दारी होता काम नये. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. २५ वर्षे झालीत पिंपरी-चिंचवड शहराची एकहाती सत्ता होती. माझे पिंपरी-चिंचवड शहरावर नेहमीच प्रेम राहिले आहे. शहराचा विकास व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा असते, तसे नेहमी झुकते माप दिले. सहानुभूती नाही, तर विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली पाहिजे.

पिंपरी-चिंचवडचा विकास हाच आमचा ध्यास आहे. नाना काटे यांना उमेदवारी देताना तोडीस तोड उमेदवार होते. पण, त्यांनी पिंपळे सौदागरचा कायापालट केला आहे. त्या परिसरात चांगला विकास केला आहे. म्हणून त्यांना उमेदवारी दिली. पिंपळे सौदागर हे रोल मॉडेल आहे. प्रचारासाठी अनेक नेते मंडळी येतील. मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश आलेच पाहिजे, असे अजित पवार यांनी ठणकाहून सांगितले.

हेही वाचा – लोणावळा : टोल नाक्यावरील टोल यंत्रणेत बिघाडामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर प्रचंड कोंडी

मावळमधील २५ वर्षांची सत्ता आपण उखडून टाकली तशीच ताकद आपल्याला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दाखवायची आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी कामाला लागा. राज्यात गलिच्छ, घाणेरडे, राजकारण झालेले आपण पाहिले. आता चिंचवड पोटनिवडणूक जिंकून त्यांना दाखवून देण्याची संधी आपल्याकडे आहे, असेही अजित पवार म्हणाले.