पिंपरी : प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात संवाद व्हावा. पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा. मनावरील तणाव कमी व्हावा, यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा वाढदिवस पोलीस ठाणे, शाखा येथे साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे शहर पोलीस दलातून स्वागत केले जात आहे.

प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात, शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाढदिवस लक्षात नसतो. कारण त्यांचा प्रत्येक कर्मचाऱ्याशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सुट्टी मागण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अधिकारी आणि सुट्टी मागणारे कर्मचारी यांच्यात गैरसमज होतात. त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पोलीस आयुक्त प्रयत्न करीत आहेत.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
nashik district collector jalaj sharma
नववर्षात जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी गणवेशात, जलज शर्मा यांच्यासह मनिषा खत्री यांचीही पायी भ्रमंती
Chief Minister Devendra Fadnavis decision regarding the police
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, पारंपरिक स्वागत, पोलीस मानवंदना बंद

हेही वाचा >>>शिकवणीसाठी आलेल्या मुलीशी अश्लील कृत्य; अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा

सततचा बंदोबस्त आणि कामाच्या ताणामुळे पोलिसांना आपल्या कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. अति ताणामुळे पोलिसांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. अनेक वेळेला पोलिसांना आपले वाढदिवस साजरे करता येत नाहीत. पोलीस आयुक्त  चौबे यांनी याची दखल घेतली आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा वाढदिवस लक्षात रहावा तसेच समन्वय राखला जावा यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आयुक्तांनी सुरु केलेल्या उपक्रमामुळे पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी मिळणार असल्याने त्यांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येणार आहे. तसेच पोलीस ठाण्यात, शाखेत वाढदिवस साजरा होणार असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील संबंध वृद्धिंगत होतील. या उपक्रमांतर्गत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलीस स्टेशन, शाखेत केक कापून वाढदिवस साजरा केला जाईल. त्यानंतर प्रभारी अधिकारी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याला पोलीस आयुक्तांच्या शुभेच्छा संदेशाचे पत्र देतील.

हेही वाचा >>>‘महामेट्रो’ला आर्थिक भुर्दंड

भोसरी पोलीस ठाण्यात राबवला देशातील सर्वात पहिला उपक्रम

भोसरी पोलीस ठाण्यात भोसरीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले,‌ पोलीस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी हा उपक्रम राबविला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त आणि निवृत्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी सर्वप्रथम देशात भोसरी पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाची चर्चा सर्वत्र झाली होती.

पोलीस दैनंदिन काम करत असताना अनेकदा त्यांचा वाढदिवस देखील त्यांच्या लक्षात राहत नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांचा शुभेच्छा संदेश संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याला दिला जाणार आहे. पोलीस आयुक्त हे शहर पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे, ही भावना या उपक्रमाद्वारे प्रत्येकाच्या मनात निर्माण होणार असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले.

Story img Loader