अनोळखी तरुणीने WhatsApp वरुन केलेला न्यूड कॉल तरुणाला पडलं महागात

२४ वर्षीय तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

WhatsApp Call
प्रातिनिधिक फोटो

पिंपरी-चिंचवडमध्ये अशाच एका न्यूड कॉल चॅटिंगमुळे २४ वर्षीय तरुणांची अब्रू सोशल मीडियावर टांगणीला लागली होती. अनोखळी तरुणीसोबत व्हॉट्सअ‍ॅपवरून न्यूड व्हिडिओ कॉलिंग करणं चांगलंच महागात पडलं असतं. मात्र, वेळीच तरुणाने पोलिसात धाव घेतली अन पुढील अनर्थ टळला. तरुणीने व्हॉट्सअ‍ॅपवरील तरुणाचा न्यूड व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला होता. तोच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत ही तरुणी त्याच्याकडून पैशांची मागणी करु लागली.

सध्याच्या जगात सोशल मीडियावरील अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. करोनामुळे अनेकजण घरातच असून सोशल मीडियाचा आधार घेताना पाहायला मिळतात. मात्र, काही तरुण सोशल नेटवर्किंगच्या नादी लागून स्वत:ला संकटात टाकतानाचं चित्र दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरामधील एका २४ वर्षीय तरुणासोबत असंच काहीतरी घडलं. रात्रीच्या सुमारास एका अनोखळी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरुन एका तरुणीने हाय असा मेसेज पाठवला. काही क्षणाचा ही विलंब न करता फिर्यादी तरुणाने तरुणीला रिप्लाय दिला. त्यांच्यात अवघ्या पंधरा मिनिटांचा संवाद झाला आणि यातून थेट तरुणीने न्यूड व्हिडिओ कॉल करू का अशी विचारणा केली.

तरुणाने देखील होकार देत न्यूड कॉलची विनंती स्वीकारली केला. हे सर्व सुरू असताना दोघेही नग्नावस्थेत होते. तरुणीने तरुणाचा न्यूड कॉल रेकॉर्ड केला. त्यावरून तरुणाला तुझा न्यूड कॉल युट्युब, फेसबुक, नातेवाईक, व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजारांची मागणी केली. तरुणांकडे पैसे नसल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली असून संबंधित तरुणीविरोधात माहिती तंत्रज्ञान काद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गोवले यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Whatsapp nude call blackmailing in pimpri chinchwad kjp scsg

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार