चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अजित पवार यांना लक्ष करत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करत अजित पवारांना ४४० व्होल्टचा करंट द्या, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. आज अजित पवारांच्या त्याच वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी न बोलता निघून जाणे पसंत केले आहे. बावनकुळे हे पिंपरी- चिंचवडच्या सांगवीमध्ये आयोजित प्रमोदजी मिश्रा यांच्या अष्टविनायक शिवमहापुराण कथेच्या सांगता समारोपाच्या निमित्त आले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप हेदेखील उपस्थित होते. हेही वाचा - पुणे: नदीपात्रात गणपती विसर्जनाला मनाई; हौदांचा वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन हेही वाचा - चोरट्याची शक्कल… दुचाकी चोरल्यावर तो बदलायचा आठ ते दहा शर्ट! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान अजित पवार यांना ४४० व्होल्टचा करंट द्या, असं वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावर आधारित बावनकुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बावनकुळे यांनी न बोलता निघून जाणे पसंद केले. चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान भाजपासाठी अजित पवार हे विरोधक होते. आता तेच अजित पवार राष्ट्रवादीमध्ये बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. एकीकडे अजित पवार यांचा उमेदवार पराभूत करून त्यांना ४४० व्होल्टचा करंट द्या, असं म्हणणारे बावनकुळे आता सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले, असं बोललं जातं आहे.