scorecardresearch

Premium

World AIDS Day : “एका घटनेनं माझं स्वप्न बेचिराख झालं, पण मी हरलो नाही”

“स्वतःला एचआयव्हीची लागण झालेली असल्याने एचआयव्ही पॉझिटिव्ह मुली सोबतच लग्न करण्याचा निश्चय केला. लग्नानंतर आमचं आयुष्यच बदलून गेलं.”

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

– सागर कासार 

जगभरात १ डिसेंबर हा जागतीक एड्स दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी विविध उपक्रमांद्वारे या गंभीर आजाराबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाते. या आजाराने ग्रस्त अनेक व्यक्ती आपल्याला समाजात पाहयला मिळतात. एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाली असल्याचे जेव्हा वैद्यकीय चाचण्यांमधून अचानक उघड होते, तेव्हा त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचाही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. पुण्यातील अशाच एका व्यक्तीसोबत आजच्या या विशेष दिनी लोकसत्ता ऑनलाइनने संवाद साधला. या व्यक्तीची प्रेरणादायी काहाणी इतरांना पुढे जाण्याची प्रेरणा देईल अशीच आहे.

sex change operation indore man
लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलाची मुलगी झाला; ४५ लाख खर्च केल्यानंतर प्रियकराकडून लग्नासाठी नकार
parents were scared by seeing a child head is seen stuck in the railing of the staircase
बापरे! क्षणभरासाठी आई वडील घाबरले, खोडकर चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून डोकं धराल
illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी
a husband dance with wife sitting on wheelchair emotional video goes viral
“नवरा असावा तर असा!” व्हीलचेअरवर बसलेल्या पत्नी बरोबर केला सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

पुण्यातील गोपीनाथ (नाव बदललेले) सांगतात की, माझं आयुष्य इतर मुलांप्रमाणेच होतं, घरात देखील सर्व ठीकठाक होत. लहानपणापासून ठरवलं होतं की खूप शिकायचं तसंच धावपटू किंवा कुस्तीपटू होण्याच स्वप्नंही उराशी बाळगलं होतं. त्यादृष्टीने शिक्षणाबरोबरच खेळाची आवड देखील कायम ठेवली. एका एका टप्प्यावर यशस्वी होत असताना एकदा मी स्पर्धेसाठी मित्रांसोबत एका ठिकाणी रेल्वेने निघालो होतो. प्रवासादरम्यान एक मित्र रेल्वेच्या डब्यातील दरवाजाजवळ ब्रश करीत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो बाजूच्या रुळावर पडला. मित्राला वाचविण्यासाठी, मी देखील उडी मारली. मात्र, मित्राला काही वाचू शकलो नाही.

या घटनेत मी जखमी झालो, त्यानंतर मला एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. माझी जखम खूप होती आणि मला रक्त पुरवठ्याची गरज होती. माझ्यावर उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. या अपघाताच्या घटनेतून बाहेर पडण्यास खूप काळ गेला. कारण या घटनेत माझ्या मित्राचा मृत्यू मी डोळ्यासमोर पहिला होता. यानंतर मी स्पर्धा परिक्षा दिली आणि यामध्ये पास देखील झालो. ज्यावेळी ड्युटीवर जॉईन व्हायचे होते, त्यावेळी माझी मेडीकल टेस्ट करण्यात आली तेव्हा मला एचआयव्हीची लागण झाल्याचे रिपोर्टमधून समजलं. ही बातमी कळताच मला धक्काच बसला, आयुष्य संपल्यासारखं वाटलं.

सर्वसाधारणपणे ज्यामुळे हा आजार होतो असे मानले जाते तसे कुठलेही कृत्य आयुष्यात आपल्या हातून कधीही घडले नव्हते. तरी देखील मला हा आजार कसा होऊ शकतो, हा विचार करीत असताना मला आठवलं की मित्राच्या अपघातावेळी मला रक्त देण्यात आलं होतं. त्यातूनच मला हा आजार झाल्याचे समोर आले. आता एवढा काळ लोटल्यानंतर कोणाला यासाठी जबाबदार धरायचे असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, आता जे झालं ते झालं असं ठरवंत आपण अधिक खंबीर होऊन पुढील आयुष्य सुखात जगायचं ठरवलं आणि त्यानंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या मुली सोबतच लग्न करण्याचा निश्चय केला, त्यानुसार लग्न देखील झालं. आज आमच्या लग्नाला सहा वर्षे झाली असून मला एक मुलगाही आहे. तो एचआयव्ही निगेटिव्ह आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी जीवन जगत आहोत.

या घटेननं मात्र माझं आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याच स्वप्नं भंगलं होतं. मात्र, आता मुलाच्या रुपात मी पुन्हा हे स्वप्न पाहत असून त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When that incident destroy my deams but i didnt give up says pune man on the ocassion of world aids day aau

First published on: 01-12-2019 at 14:59 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×