पतीच्या लैंगिक छळाला कंटाळून पत्नीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती पॉर्न फिल्म बघून पत्नीचा लैंगिक छळ करत होता. यातूनच आरोपी पत्नीने पतीची हत्या करण्याची योजना आखली. त्यानुसार मंगळवारी पहाटेच्या सुमारास सासू आणि दीर कामावर गेल्यानंतर गाढ झोपेत असलेल्या पतीच्या गळ्यावर फावड्याने घाव घालून तिने त्याचा खून केला. या प्रकरणी पत्नीने गुन्हे शाखा युनिट ५ च्या अधिकाऱ्यांना गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला व मृत व्यक्तीचा अडीच वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. देहूरोड येथील मामुर्डी येथे हे कुटुंब राहायचं. दरम्यान, कुटुंबात मृताची आई, भाऊ आणि पत्नी हे राहायचे. मृत व्यक्तीस काही प्रमाणात मद्यपान करण्याची सवय देखील होती असे पोलिसांनी सांगितले असून, तो पॉर्न फिल्म बघून पत्नीचा लैंगिक छळ करायचा. याच कृत्याला कंटाळून पत्नीने एकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. लैंगिक छळ होत असल्याचं दोन्ही कुटुंबांना तिने सांगितले होते. गेली अडीच वर्षे झालं हे सर्व सहन करत असताना, चार दिवसांपासून पतीचा त्रास संपावयचा अशी योजना तिने आखली होती. त्यानुसार पती एकटा कधी सापडणार? याची वाट पाहात होती.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा महिलाचे पती मद्यपान करून गाढ झोपला होता. तर, त्याची आई आणि भाऊ हे रात्रपाळीवर कामाला गेले होते. पहाटेच्या सुमारास आरोपी पत्नी सकाळी फिरून येताच गाढ झोपेत असलेल्या पतीच्या गळ्यावर फावड्याने घाव घालून त्याचा खून केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट ५ ने तिला अटक केली असून गुन्ह्याची तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांच्या पथकाने केली आहे.