“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” हे शब्द मागील काही दिवसांपासून अनेकदा तुमच्या कानावर पडले असतील किंवा वाचनात आले असतील. एकीकडे राज्यामध्ये शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील याच शब्दांमुळे चर्चेत आले आहेत. शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना म्हटलेले हे शब्द सध्या तुफान व्हायरल होत आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची सध्या इतकी चर्चा आहे की यावरुन चक्क गाणीही तयार करण्यात आली आहेत. पण या ‘झाडी, डोंगार, हाटील’ ट्रेण्डचा वापर करुन पुणेकरांनी निकृष्ट रस्त्यांसंदर्भातील एक समस्या सोडवून दाखवल्याचं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर दिसून येतेय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असणारा ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदार म्हणतो, “फडणवीसांच्या नावाने…”

झालं असं की, पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर मधोमध असलेल्या गटाराच्या झाकणांच्या निकृष्ट कामाबद्दल स्थानिकांनी अनेकदा तक्रार केली होती. या तक्रार करणाऱ्यांमध्ये रमणबाग प्रशाला आणि लक्ष्मी रस्ता परिसरात नागरिकांचा प्रामुख्याने समावेश होता. रस्त्याच्या मधोमध असणारं हे गाटराचं झाकणं तुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिक याचा पाठपुरवठा करत होते. मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता आणि कामही होत नव्हतं.

The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
mutha canal
मुठा कालव्याच्या दोन्ही बाजूला जमावबंदीचे आदेश
A donation of Rs 1 crore was received due to the social media post pune news
समाजमाध्यमांतील पोस्टमुळे मिळाली एक कोटींची देणगी!
Mango exports were hit hard by the Israel Palestine war Pune news
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला मोठा फटका…झाले काय?

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: मुंबईला कधी परत येणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मुंबईला आम्ही…”

अखेर पुणेकरांनी त्यांच्या स्टाइलने या प्रश्नावर तोडगा काढण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी सध्या राजकीय संघर्षामुळे आणि गुवाहाटीमधील निर्सगामुळे चर्चेत असणाऱ्या ‘झाडी, डोंगार, हाटील’ ट्रेण्डची मदत घेण्याचं ठरवलं. या गटाराच्या झाकणावर रस्त्याच्या संबंधित ठेकेदाराविरोधात सोमवारी फलक लावण्यात आले. या फलकावर ठेकेदाराचा क्रमांक आणि ‘झाडी, डोंगार, हाटील’ ट्रेण्ड स्टाइलमध्ये काही वाक्य लिहिण्यात आली होती.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य

पुणे शहराचे खड्ड्यांचे कॉन्ट्रॅक्टर… या मथळ्याखाली एक प्रिंट काढून त्याखाली कंत्राटदार कंपनीचं नावं. त्या खालोखाल पुणे महानगरपालिकेतील संबंधित विभागामधील दोन अधिकाऱ्यांचीं नावं आणि मोबाइल क्रमांक लिहिण्यात आलेले. तसेच अगदी पुणेरी टोमणे स्टाइल, “सांगून, अर्ज देऊन, भेटून यांना कळत नाही ही शोकांतिका” असा टोला लगावण्यात आलेला. फलकावर शेवटी अगदी बोल्ड फॉण्टमध्ये ‘काय ते शहर, काय ते खड्डे, काय त्या रोडची अवस्था… समदं व्यवस्थित,’ असा मजकूर लिहिण्यात आलेला. गटाराच्या झाकणांवरच हे प्रिंट काढून लॅमिनेट केलेले आणि एका लाकडाच्या पट्टीला जोडलेले फलक ठेवण्यात आलेले. या फलकांचे फोटो व्हायरल झाले आणि बघता बघता मेसेज जिथं पोहचणं आवश्यक होता तिथपर्यंत पोहोचला आणि चक्र फिरली.

नक्की वाचा >> विश्लेषण : बहुमत म्हणजे काय? ते कसं, कोणाला आणि कधी सिद्ध करावं लागतं?; महाराष्ट्रातील बहुमताचे निकष काय?

नागरिकांची ही भन्नाट कल्पना कामी आली आणि त्याचा परिणाम होऊन मंगळवारी या झाकणाच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. अवघ्या काही तासांमध्ये हे काम पूर्ण करण्यात आलं. हे काम केले जात असल्याचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

सांगायचा मुद्दा काय तर एकाकीडे सारेच लोक केवळ या ‘झाडी, डोंगार, हाटील’ ट्रेण्डचा मनोरंजन म्हणून वापर करत असतानाच दुसरीकडे स्मार्ट पुणेकरांनी याच ट्रेण्डच्या मदतीने आपल्या दैनंदिन जीवनातील एक प्रश्न मार्गी लावलाय. या प्रकरणावरुन सोशल मीडियावर अनेकजण या कल्पकतेला दाद देताना दिसत आहेत. तर बऱ्याच जणांना पुणेकरांबद्दलचं ट्रेण्डमार्क वाक्य या प्रकरणाचा निमित्ताने पुन्हा आठवलंय ते म्हणजे, “पुणे तिथे काय उणे”