भटक्या श्वानांचे संगोपन करणाऱ्या महिलेला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : गॅस सिलिंडरची समस्या ऑनलाइन सोडवायला गेली ज्येष्ठ महिला; बसला ५.७ लाखाला गंडा

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

हेही वाचा – पुणे जिल्ह्यात माजी खासदार-आमदारांचे पुनर्वसन

अंकित पाठक (रा. इन्फिनिया सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका श्वानप्रेमी महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाठक आणि तक्रारदार एकाच भागात राहायला आहे. संबंधित महिला श्वानांचे संगोपन करते. भटक्या श्वानांना खायला देते. सोसायटीच्या परिसरात भटक्या श्वानांना खायला का देता, अशी विचारणा करून पाठकने श्वानप्रेमी महिलेशी वाद घातला. महिलेने मोबाइलवर चित्रीकरण केले, तेव्हा पाठकने महिलेला धक्काबुक्की करून महिलेचा मोबाइल संच हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक डमरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.