केस विंचरण्यावरून आणि सततच्या टोमण्याला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासू आणि दोन नणंदांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. शशिकला प्रदीप जाधव ( २८) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे: शाळकरी मुलीवर बलात्काराचा प्रकार चार वर्षांनी उघड

शशिकला यांचे पती दिव्यांग असून शशिकला या महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करायच्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकला प्रदीप जाधव यांचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना १३ वर्षाचा एक मुलगादेखील आहे. त्या महानगरपालिकेत कंत्राट पद्धतीवर काम करायच्या तर पती दिव्यांग असल्याने घरातील सर्व जबाबदारी सांभाळत असे. परंतु, सासू आणि दोन नणंदा शशिकला यांचा छोट्या-मोठ्या आणि किरकोळ कारणांवरून शारीरिक आणि मानसिक छळ करायच्या. तसेच, कपडे घालण्याच्या पद्धतीवरून, केस विंचरण्यावरून त्या सतत टोमणे मारायच्या. शिवीगाळ करायच्या. याच कारणांमुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात शशिकला यांच्या बहिणीने तक्रार दिली असून सासू आणि दोन नणंदांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.