केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

पुण्यात आत्महत्यचे सत्र सुरूच

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. आज केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  नैराश्यातून  या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. यासना मुकेश बकसाना (वय 36) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मृत यासना मुकेश बकसाना यांच्या पतीचे तीन महिन्यांपुर्वी कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या 13 वर्षाच्या मुलगा देखील आजारी पडला. त्याला डायबेटिस आणि किडनीचा त्रास असल्याने अनेक दिवसांपासून केईएम रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे परिस्थितीसमोर हताश झालेल्या यासना यांनी पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास समर्थ पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी करत  आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman commits suicide by jumping from fifth floor of kem hospital msr 87 svk

ताज्या बातम्या