पुणे : मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. अपघातात दाम्पत्य जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपाली वैभव बर्गे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात पार्वती आदिनाथ वायदंडे (वय ५०, रा. साईराज बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) आणि त्यांचे पती आदिनाथ जखमी झाले.

पार्वती यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली, त्यांची मैत्रीण पार्वती, पती आदिनाथ शनिवारी रात्री आठच्या सुमारास कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कात्रज घाटातून पुण्याकडे निघालेल्या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दीपाली यांना धडक दिली. पार्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना धडक देऊन टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी
in nashik Bus lost control at highway station, crashing into control room woman died and passengers injured
नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी
60 year old woman injured in stray dog attack near Titwala complex
टिटवाळ्यात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
computer engineer dies after returning home from workout at gym
व्यायाम शाळेतून घरी येताच संगणक अभियंत्याचा मृत्यू; कुस्तीगिराच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी घटना
Two drown in Pawana Dam after boat capsizes Pune print news
बोट उलटल्याने दोघांचा पवना धरणात बुडून मृत्यू; मृतदेह शोधण्यात यश
two youths drowned pune
पुणे : पवना धरणात दोन तरुण बुडाले

हेही वाचा – पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – मावळ विधानसभा: अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट! महायुतीत पडले एकटे?

अपघातानंतर नागरिकांनी दीपाली, पार्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दीपाली यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाेचालकाच शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी कात्रज भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Story img Loader