पुणे : भरधाव दुचाकी घसरुन सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कोँढव्यातील टिळेकरनगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार पती जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुनितादेवी विजयकुमार सिंग (वय ४८, रा. व्यंकटेश गॅलक्सी अपार्टमेंट, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात विजयकुमार शिवमंगल सिंग (वय ५४) जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार विजयकुमार यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार बिपीन सूर्यवंशी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
two wheeler driver died in Akola on Tuesday after his throat was cut by nylon manja
नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

हेही वाचा >>>महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विजयकुमार आणि त्यांची पत्नी पुनितादेवी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास टिळेकरनगर परिसरातून निघाले होते. भरधाव दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार विजयकुमार आणि पुनितादेवी पडले. पुनितादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ससून रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पुनितादेवी यांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Story img Loader