लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: प्रेमाचे नाटक करुन तरुणाकडून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये उकळणाऱ्या तरुणीच्या धमक्यांमुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

या प्रकरणी ज्योती गिरी, गौरी गिरी, राजेंद्र गिरी आणि नाना जगदाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज मल्हारी सोनवणे (वय ३१, रा. टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सोनवणेच्या पत्नीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवराज सोनवणे याच्याशी प्रेमाचे नाटक करुन आरोपी ज्योती गिरीने त्याला जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्याच्याकडून ज्योतीने पाच लाख रुपये उकळले तसेच सोन्याचे दागिने घेतले होते.

आणखी वाचा- कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; चार परदेशी महिलांसह सातजणी ताब्यात

ज्योतीने समाजमाध्यमावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिली. पोलिसांकडे तक्रार देते, असे सांगून युवराजला धमकावण्यास सुरुवात केली. ज्योतीच्या अवास्तव मागण्यांमुळे युवराज घाबरला होता. दोन दिवसांपूर्वी तो टिटवाळ्याहून पुण्यात आला. आरोपी ज्योती गिरी राहत असलेल्या खडकी परिसरातील रेंजहिल्स भागातील सोसायटीत गेला. युवराजने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी खडकी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. युवराजने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) पोलिसांना सापडली. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली. दरम्यान, युवराजच्या पत्नीने फिर्याद दिली. त्यानंतर युवराजच्या आत्महत्येस जबाबदार असल्या प्रकरणी पोलिसांनी ज्योती गिरीसह चौघा जणांच्या विरुद्ध गुन्हा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ तपास करत आहेत.