पुणे : अनैतिक संबंधातून देण्यात येणाऱ्या त्रासामुळे महिलेने पिंपरीतील उपाहारगृहचालक विजय ढुमे यांचा साथीदारांशी संगनमत करुन खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ढुमे यांचा सिंहगड रस्ता भागातील एका लॉजसमोर दोन दिवसांपूर्वी खून झाला होता. सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन महिलेसह साथीदारांना अटक केली.
हेही वाचा >>> प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळा येथे आधी पर्यटक मुलींचं अपहरण, मग सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून मोठी कारवाई
याप्रकरणी सुजाता समीर ढमाळ (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता), संदीप दशरथ तुपे (वय २७, रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे)
हेही वाचा >>> तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द
ढुमे यांचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ढुमे यांच्या खुनामागचे कारण न समजल्याने पोलिसांनी निकटवर्तीयांची चौकशी सुरू केली होती. तपासात ढुमे यांचे सुजाताशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी सुजाताशी चौकशी सुरू केली. ढुमे सुजाताला त्रास देत होता. त्याचा त्रासामुळे तिने संदीपशी संगनमत करुन ढुमे यांचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी सुजाता, संदीप आणि साथीदारांना ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सचिन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, सतीश नागूल, सुनील चिखले, संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील आदींनी ही कारवाई केली. आरोपी सुजाता हिच्याशी गेल्या १३ वर्षांपासून उपाहारगृहचालक ढुमे याचे अनैतिक संबंध होते. सुजाताचे चार महिन्यांपूर्वी आरोपी संदीप तुपे याच्याशी अनैतिक संबंध जुळले. दोघांची समाजमाध्यमातून ओळख झाली होती. ढुमे याच्या त्रासामुळे तिने संदीपशी संगनमत करुन ढुमेचा खून करण्याचा कट रचला.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman killed restaurant manager in pimpri due to harassment caused by the immoral relationship pune print news zws