अंमली पदार्थ विक्री प्रकरणात पोलिसांना पाच वर्ष गुंगारा देणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतून अटक केली. जेलुखा मोहम्मद हुसेन कुरेशी उर्फ जुलैखाबी उर्फ जिल्लो (वय ४०, रा. सय्यद अलीव्ह, प्रभात काॅलनी, सांताक्रुझ, मुंबई) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा- ‘अपरिहार्य’ कारणांमुळे पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक १५ जानेवारीपर्यंत सादर होणार नाही

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

येरवडा भागात संगमवाडी पूल परिसरात अंमली पदार्थ विक्री प्रकरणात अफजल इमाम नदाफ (वय २६, रा. सोलापूर), अर्जुन विष्णू जाधव (वय ३२, रा. लोणावळा) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पाेलिसांकडून दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी कुरेशीकडून मेफेड्रोन खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. कुरेशी मुंबईत राहत असून तिच्या विरोधात पाच वर्षांपूर्वी अंमली पदार्थांची विक्री प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती पोलिसांना गुंगारा देत होती.

हेही वाचा- मुंबई, पुण्याची हवा बिघडली; पुढील दोन दिवस मुंबईत अतिधोकादायक, तर पुण्यातील हवा धोकादायक पातळीवर

मुंबईतील सांताक्रुझ परिसरात कुरेशी वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस कर्मचारी मारुती पारधी आणि मनोज साळुंके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, राहुल जोशी आदींनी ही कारवाई केली.