पिंपरी : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना बावधन येथे घडली. मनीषा प्रकाश जाधव (वय ३८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश नागनाथ जाधव (४३, बावधन बुद्रुक) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्यांच्या मुलाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. प्रकाश हा घटनास्थळावरून रुग्णवाहिका आणण्याच्या बहाण्याने निघून गेला. त्यामुळे खुनाचा संशय निर्माण झाला. प्रकाश याची नोकरी गेली होती. त्यामुळे घरात आर्थिक अडचण निर्माण झाली होती. तसेच वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून दोघांमध्ये सतत भांडण होत होते. या कारणावरून वडिलांनी आईचा खून केल्याचे प्रवीण यांनी फिर्यादीत म्हटले आहे.