पुणे : रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावते सांगून महिला टीसीनेच घातला साडेआठ लाखांचा गंडा

आरोपी महिला आणि तक्रारदार महिलेची ओळख ब्युटी पार्लरमध्ये झाली, नंतर मैत्री झाल्यावर या महिलेने आर्थिक गंडा घातला.

job fraud
पोलीस स्थानकामध्ये केली तक्रार

महिला रेल्वे टीसी अधिकाऱ्याने दुसऱ्या महिलेला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावते असं सांगून तब्बल आठ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवनी पाटणे असं २५ वर्षीय आरोपी महिला टीसी अधिकाऱ्याचे नाव आहे. सुमित्रा हुले यांनी निगडी पोलिसाकडे केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे ब्युटी पार्लर असून याच ठिकाणी आरोपी महिला आणि तक्रारदार महिलेची ओळख झाली. संजीवनी यांनी रेल्वेत टीसी असल्याचं सुमित्रा यांना सांगितलं होतं. हळूहळू या दोघींची मैत्री झाली. दरम्यान, जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा नोकरीसंदर्भात त्यांच्यात चर्चा होत असे. मी रेल्वेत टीसी या पदावर असून तुला आणि तुझ्या भावाला नोकरी लावते असे संजीवनीने ३२ वर्षीय सुमित्रा यांना सांगितलं.

नोकरीचं आश्वासन देऊन संजीवनीने सुमित्रा यांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार सुमित्रा यांनी भावाचे आणि त्यांचे मिळवून एकूण ८ लाख ५० हजार रुपये संजीवनीला दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. मात्र पैसे दिल्यानंतरही दोघांपैकी एकालाही नोकरी लागली नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सुमित्रा यांनी निगडी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी संजीवनीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women gave fake promise offered tc job in railway looted 8 and half lakh kjp scsg

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या