scorecardresearch

पुणे: हडपसरमध्ये चार वर्षांच्या मुलीचा आईकडून चाकूने भोसकून खून

पोटच्या चार वर्षांच्या मुलीचा चाकूने भोसकून आईने खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली.

Beed Crime News
जाणून घ्या काय घडली घटना? प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पोटच्या चार वर्षांच्या मुलीचा चाकूने भोसकून आईने खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी आईला हडपसर पोलिसांनी अटक केली. मुलीच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही.

वैष्णवी महेश वाडेर (वय ४) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी तिची आई कल्पना हिला हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात ही घटना घडली. कल्पना तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. पंधरा दिवसांपूर्वी कल्पना हडपसर भागातील सिद्धीविनायक दुर्वांकूर सोसायटी परिसरात राहायला आली. तिने भाडेतत्वावर घर घेतले होते. ती बेकरी माल विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी (२७ मार्च) घरमालकाने जागा सोडण्यास सांगितले होते.

आणखी वाचा- पुणे विमानतळावर आता ‘फेशियल रिक्गनिशन’, प्रवाशांसाठी आतमध्ये प्रवेश करणे आणि सुरक्षा तपासणी होणार सुटसुटीत

घरमालक घरी गेला. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. घरमालकाने कल्पनाला दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा तिने दरवाजा उघडला नाही. शेजारी आणि घरमालकाने तिला दार उघडण्यास सांगितले. तिने दरवाजा उघडला. तेव्हा वैष्णवीवर चाकूने वार करुन तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. घरमालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कल्पनाला ताब्यात घेतले. कल्पनाने मुलीचा खून का केला, यामागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या