Women meeting Republican Party today presence Ramdas Athawale Pimpri Chinchwad tour pune print news ysh 95 | Loksatta

पिंपरी: आठवले यांच्या उपस्थितीत आज रिपाइंचा महिला मेळावा

केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले सोमवारी (३१ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत.

पिंपरी: आठवले यांच्या उपस्थितीत आज रिपाइंचा महिला मेळावा
रामदास आठवले ( संग्रहित छायाचित्र )

पिंपरी: केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले सोमवारी (३१ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. कासारवाडी येथील ‘कलासागर’ हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी पक्षाच्या प्रदेश महिला आघाडीच्या वतीने राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर आठवले यांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2022 at 10:22 IST
Next Story
हजारो दिव्यांनी झगमगली नांदेड सिटी