scorecardresearch

पुणे : लष्करी अधिकारी महिलेच्या घरातून पाच लाखांचे दागिने लांबविले ; खडकीतील घटना

लष्करी अधिकारी महिलेच्या घराचा कोयंडा उचकटून चोरट्यांनी शयनगृहातील पाच लाख ३२ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली.

दागिने चोरी,gold theft
( संग्रहित छायचित्र )

लष्करी अधिकारी महिलेच्या घराचा कोयंडा उचकटून चोरट्यांनी शयनगृहातील पाच लाख ३२ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली.

याबाबत मेजर डॅा. पदनाल वर्गीस (वय ३५, रा. जुनी मंडाले लाइन, रेंजहिल्स, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॅा. वर्गीस खडकीतील वैद्यकीय रुग्णालयात नियुक्तीस आहेत. त्यांचे पती मुंबईतील खासगी कंपनीत अधिकारी आहेत. डॅा. वर्गीस यांना लहान मुलगी आहे. रात्रपाळी असल्याने डॅा. वर्गीस यांनी त्यांच्या लहान मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवले होते.

डॅा. वर्गीस सायंकाळी साडेसातच्या सुमारास घर बंद करुन रुग्णालयात गेल्या. चोरट्यांनी बैठ्या घराचा कडी-कोयंडा उचकटला. शयनगृहातील कपाटातून पाच लाख ३२ हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. सकाळी नऊच्या सुमारास डॅा. वर्गीस रुग्णालयातून घरी आल्या. तेव्हा दरवाज्याचा कोयंडा उचकटल्याचे लक्षात आले. शयनगृहातील कपाटातून दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women military officers ornaments were house theft khadki report police pune print news amy

ताज्या बातम्या