राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

पुणे : महिला पोलिसांना पोलीस दलातील नोकरीबरोबरच कौटुंबिक जबाबदारी सांभाळत मुलांचे संगोपन करण्याबरोबरच इतरही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन पोलीस दलातील महिलांची डय़ुटी आठ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांवर कौटुंबिक जबाबदारी असते. नोकरी आणि १२ तासांची डय़ुटी यामुळे महिला पोलिसांवर ताण येतो. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक स्थितीवर होतो. त्यामुळे पोलीस दलातील कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारीचा ताळमेळ बसविण्यासाठी पोलीस दलातील महिलांना आठ तासांची डयुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे कामाचे तास कमी केल्याने त्यांना कुटुंबाकडे लक्ष देणे शक्य होईल, असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आदेशात म्हटले आहे.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
Police action against 142 drunken drivers in Dhulwadi pune news
धुळवडीला १४२ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात; नियमभंग करणाऱ्या साडेअकराशे वाहनचालकांवर कारवाई

महिला पोलिसांनी कामाची वेळ कमी करण्याबाबत विनंती केली होती. त्यांची विनंती लक्षात घेऊन आठ तासांची डय़ुटी योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला असून या निर्णयाचे राज्यातील विविध पोलीस आयुक्तालये तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसांनी स्वागत केले आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलात महिलांचा टक्का वाढत आहे. राज्य सेवा तसेच केंद्रीय आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक युवती बाळगतात. पदवीधर युवती पोलीस दलातील नोकरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. अन्य शासकीय विभागांच्या तुलनेत पोलीस दलात नोकरीची हमखास संधी उपलब्ध होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलात महिलांचा टक्का वाढत आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील युवती पोलीस दलातील सेवेला प्राधान्य देत आहेत.

उद्देश काय?

– १२ तासांची डय़ुटी आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे महिला पोलिसांवर ताण येतो. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक स्थितीवर होतो. कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारीचा ताळमेळ बसविण्यासाठी महिला पोलिसांना आठ तासांची डयुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– कामाचे तास कमी केल्याने त्यांचे रजा घेण्याचे प्रमाण कमी होईल. त्यांना कुटुंबाकडे लक्षही देता येईल. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्यही चांगले राहील, असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आदेशात नमूद केले आहे.  

तीन महिन्यांपासून प्रयोग

पोलिसांचे काम म्हणजे ‘ऑन डय़ुटी चोवीस तास’. कायदा आणि सुव्यवस्था, सभा, समारंभ, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बंदोबस्त तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांना बारा तासांपेक्षा जास्त काळ काम करावे लागते. विशेषत: महिला पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तीन महिन्यांपूर्वी नागपूर पोलीस दलात महिला पोलिसांसाठी आठ तासांची डयुटी योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातही तीन महिन्यांपासून ही योजना राबवण्यात येत आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलात आठ तास डय़ुटी योजना गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता महिला पोलिसांची डय़ुटी आठ तासांपेक्षा अधिक असू नये, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण