पुणे : फक्त महिला पोलीस करणार वाहतूक नियमन

फारसखाना हद्दीत महिला वाहतूक पाहणार नियमनाचे काम

जागतिक महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांकडून उपक्रम हाती घेतले जात असून, आज पुण्यातील गजबजलेल्या लाल महाल ते दत्त मंदिरापर्यंत महिला वाहतूक नियमांचं काम पाहणार आहेत. या उपक्रमास आजच्या दिवशी सुरुवात झाली असून, एखादा विभाग महिलांच्या हाती असलेलं, देशातील पहिलाच वाहतूक विभाग ठरला आहे. या अशा अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष पोलीस विभागाचे कौतुक केले जात आहे.

या उपक्रमा बाबत फरासखाना वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात म्हणाल्या की, ‘पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आणि दत्त मंदिर हा पुणे शहरातील गजबजलेला परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या ठिकाणी महिलांची सर्वाधिक वर्दळ असल्याने, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विभागात महिला वाहतूक पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निश्चित निर्माण होणार आहे,’ असं त्यांनी सांगितले.

फरासखाना वाहतुक विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या सीमा शेंडकर म्हणाल्या की, ‘मी यापूर्वी देखील वाहतूक विभागात काम पाहिले आहे. मात्र प्रथमच एक वाहतूक विभाग महिलांच्या हाती दिला ही अभिमानाची गोष्ट आहे,’ असं त्या म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women police will observe traffic in pune bmh 90 svk