पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत सात मजली अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारत आधुनिक स्वरुपात बांधण्यात यावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पवार यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करू, असे आश्वासन दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ‘लँडमार्क डिझाइन ग्रुप’ या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्यालायाच्या आवारातील बैठी कार्यालये पाडण्याचे काम पूर्ण झाले असून, मुख्य इमारत अद्याप पाडण्यात आली नाही.
पुणे पोलीस आयुक्तालयाची प्रस्तावित इमारत अत्याधुनिक असावी, यासाठी पवार यांनी पाठपुरावा केला होता. नवीन इमारतीचे संकल्प चित्र त्यांनी पाहिले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस दलातील साधन सुविधांसाठी पवार यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला होता. शहरातील घडामोडींवर त्यांचे बारकाईने लक्ष असायचे.
