scorecardresearch

पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना

दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदार विनीत गाडगीळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

सदनिकेत प्लंबिगचे काम करताना विजेचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. दयानंद तारक बनसोडे (वय ३९, रा.वनलिका सोसायटी, लवळे फाटा, पिरंगुट) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बनसोडे यांचा भाऊ अजित (वय ३६) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्लंबिग ठेकेदार विनित गोविंद गाडगीळ (वय ५५, रा. कोथरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे- किरीट सोमय्या

वारजे भागातील व्होयला सोसायटीत एका सदनिकेत दयानंद बनसोडे प्लंबिंगचे काम करत होते. त्या वेळी प्रसाधनगृहात विजेचा धक्का बसल्याने बनसोडे गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बनसोडे यांना सुरक्षाविषयक साहित्य न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघडकीस आले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदार विनीत गाडगीळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 14:18 IST

संबंधित बातम्या